Tuesday 26 April 2016

यहाँ के हम सिकंदर..

यहाँ के हम सिकंदर...

संजयकुमार डव्हळे(तहसीलदार).
राज्यात 5 वा.

एकदम बिनधास्त माणूस...
मित्रांत संजूबाबा म्हणून ओळख.
मिमिक्री हा छंद, त्यामुळे मित्रांमध्ये लोकप्रियाताही खूप लाभली.
माझी पहिली भेट Interview Group निमित्ताने  सन 2014 मधे झाली.
सुरुवातीला जास्त बोलायचा नाही, पण हळूहळू खुलला की एकदम रसिक माणूस.
खेडीपाडी आणि छोट्या शहरातील talent च ज्वलंत उदाहरण. प्रत्येकानं यात स्वतःला शोधावं अशी pure ग्रामीण touch असलेली भाषा, शिवाय त्याचा अभिमानही. संपर्कात आलेल्या प्रत्येक ग्रामीण  विद्यार्थ्याला वाटते हा आपल्यासारख्याच आहे, आपणही अधिकारी होऊ शकतो.
मूळ गाव जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराजवळ शारा, जिल्हा बुलढाणा.
शालेय शिक्षण गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेत झालेलं, त्यानंतर D.Ed केलं.
डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी खर्च पडणारे वर्षे व लागणारा खर्च यामुळे अनेक हुशार विद्यार्थी मधल्या काळात D.Ed कडे वळले, यात पटकन नोकरी हे अमिषही होत.पण कालांतराने D. Ed संदर्भात राज्यातील परिस्थिती वेगाने बदलत गेली आणि वरील विशेष संदर्भ घेऊन या क्षेत्राकडे गेलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राकडे वळले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून बहि:स्थ BA ची पदवी घ्यायची आणि तीन वर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा,असा अलिखित नियमच बनला. दखल घेण्यासारखी बाब म्हणजे या प्रवाहातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी UPSC आणि MPSC यांतील परीक्षांत लक्षणीय यश मिळवलंय.
हे व्यक्तिमत्व सुद्धा यापैकीच एक.
सन 2014 यावर्षी विक्रीकर निरीक्षक(STI),
सन 2015 यावर्षी नायब तहसीलदार,
सन 2016 यावर्षी तहसीलदार.
(राज्यात रँक आहे 5 वी)

यावर्षी उपजिल्हाधिकारी हे पद खुल्या प्रवर्गासाठी नसल्यामुळे मिळू शकले नाही आणि पोलीस प्रशासनाविषयी आदर असूनही वयक्तिक आकर्षण नसल्यामुळे Dy.SP/ACP या पदाचा पसंतिक्रम वर दिलाच नाही.परिणामी तहसीलदार पदी निवड झाली.
गेल्यावर्षी वर्ग 2 चे पद मिळाल्यावर joining ऐवजी extension साठी मी विचारल्यावर संजयने लगेचच होकार दिला.
त्यावेळी आम्ही एक सूत्र ठरविले होते..
"आणखी एक वर्ष अभ्यासाला देवून promotion साठी लागणारे 10 वर्षे वाचवायची".
सन 2016 यावर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने लावलेल्या result ने आमची व्यूहरचना योग्य असल्याचे सिद्ध केले.नायब तहसीलदार ते तहसीलदार हा अनेक वर्षांचा प्रवास एका वर्षात कापला गेला.
मराठी आणि इंग्रजी या लेखी स्वरूपात असलेल्या भाषा विषयात गुणांचा फटका बसला,या दोन विषयात कमी गुण आले. तरीही राज्यात 5 वी rank आली.
इतिहास,खेळ आणि परीक्षा यांत जर-तर ला काहीही scope नसला तरीही ...
जर भाषा विषयात average गुण आले असते तरी राज्यात पहिली rank आली असती,आणि...
आमचा अंदाज खरा ठरला असता, पण...
भाषा विषयांच्या अनिश्चिततेचा फटका बसला आणि आमचा अंदाज चुकला.
काहीही असो,
सर्वांना आपलेच प्रतिनिधित्व करतोय असे वाटणारा हा व्यक्ती आज महाराष्ट्राच्या प्रशासनात आज एका महत्त्वाच्या पदावर पोहोचलयं.
एखादी गोष्ट मनावर घ्यायची नाही आणि घेतली तर मागे हटायचे नाही या गुणविशेषामुळे सुंदर यश मिळाले.
पूर्व परीक्षेला कमी score असल्यामुळे पूर्वपरीक्षेचा result येईपर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास न करण्याची सगळी उणीव नंतर अशी काही भरून काढली की त्याचं नाव अभ्यास. 24×7 अभ्यास.
पूर्व परीक्षेचा result लागल्यानंतर झालेली आमची पहिली भेट आणि त्यातील संजयचे एक वाक्य मला नेहमी आठवते...
"सर,तुम्ही बघाच आता मी काय करतो ते..."
या वाक्याची सिद्धता आयोगाची अंतिम यादी लागल्यावर सर्वांना आली.
आपल्यातीलच एक चांगल्या rank ने तहसीलदार बनला,असे विद्यार्थ्यांना वाटू लागले.
आत्मविश्वास, स्वतःच्या बलस्थानांची व्यवस्थित जाणीव,अभ्यासाचे योग्य नियोजन, कष्ट उपसण्याची तयारी,प्रामाणिकपणा या गुणांनी हा व्यक्ती यशापर्यंत पोहोचला.

1 comment: