Wednesday 13 April 2016

स्वप्नपूर्ती- एका वडिलांची...एका मुलाकडून...

श्री.नारायण मिसाळ: उपमुख्य कार्यकारी अधिकारी      (जि. प.)
    
कोणत्याही नोकरदार वडिलांचे एक स्वप्न असते. एक सुंदर स्वप्न. आपला मुलगा आपल्या विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून यावा. आपल्या वरिष्ठांच्या खुर्चीत वडील नेहमी आपल्या मुलाला पाहत असतात. तलाठी वडिलांना वाटते मुलगा प्रांताधिकारी व्हावा, पोलीस कर्मचाऱ्यांना वाटते मुलगा Dy.SP, IPS व्हावा, ग्रामसेवकांना वाटते मुलगा CEO किंवा Dy.CEO व्हावा.
आता 5 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने  लावलेल्या अंतिम यादीत अशाच एका वडिलांची स्वप्नपूर्ती झाली.
बीड जिल्हा परिषेदेत ग्रामसेवक म्हणून आपली सेवा बजावून निवृत्त झालेल्या श्री. बाबासाहेब मिसाळ यांचा मुलगा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (Dy.CEO) झाला. वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद या नारायनरावांनी रात्रभर गुलाल उधळून, भर उन्हाळ्यात रात्रीच्यावेळी मंद,थंड वारे अंगावर झेलणाऱ्या पुण्यातील रस्त्यावर गरम चहाचे कप पोटात रिचवत मित्रांसोबत एक उत्सव म्हणून साजरा केला. या उत्सवात स्वतःच्या ध्येयपूर्तीच्या आनंदापेक्षा वडिलांच्या स्वनापूर्तीचा आनंद जास्त होता.
यांचं मूळ गाव खोकरमोह ता.शिरूर(का),जि. बीड हे आहे. पहिलीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. नंतर D.Ed करून काही वर्षे शिक्षण सेवकाची नोकरीही केली. ही नोकरी करत असताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BA केलं.
स्पर्धा परीक्षांची गोडी लागल्यावर 'दररोज अभ्यास' हा साधा, सोपा फॉर्म्युला वापरून भरपूर अभ्यास केल्यावर   विक्रीकर निरीक्षक(STI) म्हणून निवड झाली. खरं म्हणजे ही निवड स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा take off point ठरली.स्पर्धेच्या युगात वेगवान प्रवासाची नवीन उमेद निर्माण झाली.
आईवडिलांची काळजी आणि स्वतः ची नोकरी या दोन्ही आघाड्या सांभाळत दिलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या 2013 या वर्षीच्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल गेली पण मुलाखतीला केवळ 41 गुण आल्यामुळे back to pavillion चा प्रकार घडला.
सन 2015 यावर्षी झालेल्या मुख्य परीक्षेत 600 पैकी 246 असा छान score आला.
The Unique Academy मध्ये आम्ही स्थापन केलेल्या Interview Group ला यांचा प्रवेश योगायोगानेच झाला.पहिल्या भेट झाल्यावर,हे व्यक्तिमत्त्व एवढं मवाळ, सौम्य, मितभाषी असल्यामुळे यांचं कसं होणार? ही चिंता माझ्या मनाला स्पर्श करून गेली,पण याबरोबरच मागील मुख्य परीक्षेचा अनुभव, यावर्षीचा चांगला score यामुळे मुलाखतीला चांगले गुण आल्यास  वर्ग 1 चे पद मिळण्याची खात्रीही निर्माण झाली.
या व्यक्तिमत्वात मी हेरलेला चांगला गुण म्हणजे चूक निदर्शनाला आणून दिल्यानंतर प्रत्येक चूक सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न होय.
बोलण्यात स्पष्टता,देहबोलीत आत्मविश्वास, ज्ञान मांडणीत अचूकता यावी; मन शांत, स्थीर होऊन मानसिक ताणतणाव नाहीसा व्हावा म्हणून Art of Living Foundation च्या Youth Leadership Training Programme (YLTP) या कोर्ससाठी जाण्याची सूचना मी केल्यावर यांनी एका क्षणात होकार दिला.
जेथून जे चांगलं मिळेल ते वेचण्याच्या वृत्तीमुळे यश अधिक जवळ येत गेलं.यावेळी आयोगाच्या सन्माननीय सदस्यांनी  यांची मुलाखत stress interview या प्रकारात घेतली. कोणालाही नकोनकोस असलेल्या या प्रकारच्या मुलाखतीत आत्मविश्वास, व्यक्तिमत्वातील ठामपणा इत्यादी बाबी तपासल्या जातात. कधीकधी गुण ही कमी येतात. पण यावेळच्या Group Activities मुळे मानसिक सक्षमता खूपच आली होती.
परिणामी 25 मिनिटे चाललेल्या या stress interview मध्ये आयोगाने चक्क 60 गुण देऊन, वडील आणि मुलाच्या स्वप्नांना वास्तव आकार दिला.

आईवडिलांच्या डोळ्यांत मुलांमुलींसाठी खरी प्रेरणा दडलेली असते,हा दृढ विश्वास या संघर्षातून सिद्ध झाला.

मनोहर भोळे,
"राजमुद्रा", "अटेंशन प्लीज", आणि
"अभ्यास ते अधिकारी" या पुस्तकांचे लेखक.

8 comments:

  1. Tremendous consistency in his study and result of this in front of us. Well done Nara.

    ReplyDelete
  2. महाराष्ट्रात अधिकारी घडविणारा माणूस मा. मनोहर भोळे सर यांना जय हिंद

    ReplyDelete
  3. Sir assistant chi add Ali ka

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete