Sunday 20 December 2015

Dear students..Attention please

एक दीपावली अशीही...
(विद्यार्थिमित्रांनो निवांत वाचा,विचार करा,आणि आवडले तर शेअर करा).
तुम्ही सर्वांनी स्पर्धापरिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.अनेकांनी अभ्यास सुरुही केला.
या क्षेत्रात मी नोंदविलेले एक निरिक्षण म्हणजे, तुम्ही प्रचंड टेंशनमधे अभ्यास करत आहात.याची काही कारणे खालीलप्रमाणेे आहेत.
1:अभ्यास सुरु करण्यापूर्वी तुम्ही घरच्यांना केवळ एकाच प्रयत्नात अधिकारी होईल असे सांगितले.
2:इतरांचे बघून तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला इकडे पाठविले,शिवाय एकाच वर्षात अधिकारी व्हायला पाहिजे असेही सांगितले.
3:कोणताही प्राथमिक अंदाज न घेता, पुरेशी माहिती न घेता तुम्ही हे क्षेत्र निवडले.
4:तुम्ही लगेच अधिकारी होणार असे लोकांना सांगतही सुटले.
आजही अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांची अपेक्षा असते की लगेच अधिकारी म्हणून निवड झाली पाहिजे.
तुम्ही विचार करा,सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे कशा घडतील?
दीपावलीच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही सर्वांनी या मानसिक स्थितीतून बाहेर पडावे अशी अपेक्षा मी करतोय.
या सुट्टीच्या दिवसात घरच्या लोकांना या क्षेत्राची व्यवस्थित माहिती द्या.सांगा की, मी अभ्यास जीव लावून करील आणि करासुद्धा.
या क्षेत्रात अभ्यास करणे आपल्या हातात असते,अधिकारी होणे ही एका सर्वसमावेशक प्रक्रियेची बाब आहे,असे स्पष्ट सांगा.
शिवाय, महत्वाची बाब म्हणजे नैराश्यामधे स्वत:ला सांभाळा.
आयुष्य खूप सुंदर आहे.
आनंदात जगा.
तुम्ही,तुमचे कुटुंब या बाबी केंद्रस्थानी ठेवा.
आज ठरवुनच घ्या...
टेंशन अजिबात घ्यायचे नाही,अपेक्षांच्या ओझ्याखाली दबायचे नाही,एक नंबर अभ्यास करायचा पण आनंदात राहून.
त्यामुळे दिपावलीच्या लाखो दिव्यांच्या प्रकाशात तुमचे आयुष्य उजळून काढ़ा.
घरच्या सदस्यांशी मनमोकळे बोला,थोडा तुम्हाला त्रास होईल पण हिंम्मत कराच. त्यांना सर्व स्वरुप समजावुन सांगा.जीवतोड़ अभ्यास करेल असेही सांगा आणि अगोदर नमूद केल्याप्रमाणे करासुद्धा.
ही एक दीपावली अशी आपण मन मोकळे करण्यासाठी साजरी करू या.
माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो उज्ज्वल आणि प्रकाशमय भविष्यासाठी तुम्हा सर्वांनां लाख लाख शुभेच्छा..