Sunday 4 September 2016

"Jai Hind"

☺दोन भेटीतील माझा लाडका Dy. SP/ACP☺

श्री.प्रशांत बाबासो ढोले
(Dy.SP/ACP)

मूळ गाव आष्टा (जि. सांगली).
या कुटुंबाचे वैशिष्ट्ये म्हणजे बैलगाडा शर्यत आणि राजकारण यासाठी या भागातील हे प्रसिद्ध कुटुंब आहे.

           माझा मित्र प्रमोद ओलेकर ह्याच्यामुळे आमची ओळख झाली. ओळखीचा एक मुलगा मुख्य परीक्षेत पास झालाय, score सुद्धा ठीक आहे.त्यामुळं interview च्या preparation साठी त्याला भेटायचं आहे असा प्रमोदचा मला फोन आला.
पोलीस प्रशासनाविषयी मला असलेले आकर्षण आणि आपुलकीतून मी अनेक विद्यार्थ्यांना Dy. SP/ACP हा preference देण्याविषयी सुचवीत असतो.
प्रशांतच्या बाबतीतही हेच झाले.
आमच्या पहिल्या भेटीत मला कळले की , प्रशांत तहसीलदार हा (कोणालाही आवडणारे पद) पहिला पसंतिक्रम देणार, Dy. SP हा पसंतिक्रम किंबहुना देणारही नाही. आमच्या चर्चेत एक बाब स्पष्ट झाली की, यांचे मोठे भाऊ श्री. सचिन ढोलेे  (उपजिल्हाधिकारी) हे प्रशांतने Dy. SP preference देण्याच्या बाजूचे आहेत. हाच धागा पकडून मी पोलीस प्रशासनाविषयी माझे मत, कामाची व्याप्ती, promotion च्या संधी, वर्दीची क्रेझ इत्यादी बाबींची चर्चा केली.
या व्यक्तिमत्त्वाचा मला आवडलेला सर्वात चांगला गुण म्हणजे "attentive listening". समोरचा व्यक्ती बोलत असताना शांतचित्ताने ऐकून घेण्यात हा पटाईत माणूस. चार तासांच्या आमच्या बैठकीत मोठ्या भावाच्या प्रशांत विषयीच्या निर्णयाला आकार देण्यात मी यशस्वी झालो.
"देईन सर, मी Dy. SP पहिला preference", या उत्तराने मी आनंदून गेलो.
यानंतर MPSC मुलाखतीसाठी स्थापन केलेल्या  group मध्ये यांचा प्रवेश झाला.पहिला दिवस गेल्यावर दुसऱ्या दिवशी ही स्वारी group मधून गायब असल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केल्यावर असे कळले की group मधील मुलांची तयारी पाहून tension आल्यामुळे प्रशांतराव थेट गावाकडे निघून गेले. आता मुलाखतीलाच पुण्याला येणार असा पवित्रा घेतला.
गावाकडे 27 जणांचे संयुक्त कुटुंब असल्याने मोठा भावनिक आधार कायम मिळायचा. या वेळेसही मिळाला. tension ची जागा आत्मविश्वासाने घेतली.
काही दिवसांनी आमचा संपर्क परत प्रस्थापित झाल्यावर फोनवर तयारी करण्यावर आमच्यात एक आनंददायी करार झाला. फोनवर तयारी करण्याचे ठरले. आता साधारणतः दररोज चर्चा व्हायला लागली.
पोलीस प्रशासन, पदवीचे विषय,कौटुंबिक पार्श्वभूमी, प्रादेशिक माहिती,चालू घडामोडी इ. सर्व पैलू अभ्यासून झाले. MPSC च्या profile मध्ये छंद नमूद केलं नसल्यामुळे त्याविषयीची तयारी करण्याचा काही प्रश्नच नव्हता.
गावाकडे तयारी करून झाल्यावर मुलाखतीच्या आदल्या दिवशी ही स्वारी पुण्यात आली. या दिवशी प्रशांत आणि माझी दुसरी भेट झाली. ही भेट सुद्धा चार तास चालली.
केवळ छंद सोडून सर्व विषय तयार झाले होते, पण आमच्या मनात शंका आली जर आयोगाने छंदाविषयी प्रश्न विचारले तर...
आमच्या चर्चेत प्रशांतने Web Design केले असल्याचे स्पष्ट झाले.
आम्ही ठरवले की आयोगाने मुलाखतीत छंदाविषयी काही माहिती विचारल्यास "Web Design" हा छंद सांगायचा. विशेष म्हणजे आम्ही बराच वेळ बसून यावरील संभाव्य प्रश्नांची चर्चाही केली.
मुलाखतीचा दिवस उजाडला...
मुलाखतीसाठी हॉलमध्ये प्रवेश झाल्यावर , सुरुवातीची औपचारिकता पार पडल्यावर सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला..
"What is your hobby or extra curricular activity?"
बॉल एकदम बॅटवर पडला. आदल्यादिवशीचे चार तास सत्कारणी लागले. web designing, ethical hacking, cyber security protection wall इत्यादि अनेक संकल्पनांची चर्चा होत 25 मिनिटांची मुलाखत संपली.

दिनांक 5 एप्रिल 2016..
राज्यसेवेची अंतिम यादी लागली...
प्रशांत बाबासो ढोले ; Dy. SP/ACP असं नाव झळकलं.
अंतिम यादी पाहिल्यावर स्पष्ट झालं की, ज्या छंदावर मुलाखत केंद्रित झाली होती त्यात 100 पैकी 60 गुण आले.
समोरच्या व्यक्तीचे मत व्यवस्थित ऐकण्याची वृत्ती, स्वतःच्या क्षमतांची असलेली जाणीव, मानसिक तणावाच्या काळात स्व व्यवस्थापनाचे कौशल्य, प्रामाणिकपणा इत्यादि गुणविशेषांमुळे हे व्यक्तिमत्व येथपर्यंत पोहोचलं.
यश मिळाल्यावर मी प्रश्न केला...
"प्रशांत,आता कसे वाटते?"
एक थेट काळजाला भिडणारे उत्तर आलं..
"सर, हे यश पाहण्यासाठी आई किंवा बाबा यापैकी कोणीतरी या जगात हवं होतं."

लेखक,
मनोहर भोळे
(राजमुद्रा, attention please, अभ्यास ते अधिकारी )

No comments:

Post a Comment